अमरावती। मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरेंनी (MNS supremo Raj Thackeray) काल पुण्यात झालेल्या सभेत राणे दाम्पत्याचा खरपूस समाचार घेतला. हे महाशय मातोश्रीवर (Matoshri) जाऊन हनुमान चालिसा पठन करताहेत, ती काय मशिद आहे? असा खोचक सवाल राणा दाम्पत्याला केला. सभेच्या दुसऱ्या दिवशीच आमदार रवी राणा यांनी (MLA Ravi Rana) प्रत्युत्तर देताना राज ठाकरेंवर ‘त्यांच्या सभा फिक्सिंग असतात’ असा गंभीर आरोप केला आहे.
आमदार राणा म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांचे बिकट प्रश्न सुटावेत. राज्यावर आलेली अनेक संकटे दूर व्हावीत, या उद्देशाने आम्ही मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आमच्यावर टीका करणारे राज ठाकरे हे औरंगाबादमध्ये भडकाऊ भाषण करतात, मात्र त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही.
आम्हीसुद्धा हिंदू आहोत. मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण (Hanuman Chalisa) करणे काही गैर नव्हते, मात्र शिवसैनिकांनी आमचा तीव्र विरोध केला. हनुमान चालीसा पठणासाठी आलेल्या महिला खासदारांना कारागृहात डांबण्यात आले. आम्ही हिंदू असून, आमच्यावर अन्याय झाला असतानाही राज ठाकरे आमच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत गप्प आहेत. मात्र, त्यांनी पुण्यात सभा घेऊन आमच्या बाबत जे काही वक्तव्य केले ते चुकीचे असल्याचे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले.
मातोश्री हे सर्व हिंदूंचे श्रद्धास्थान!
मातोश्री ही मशीद नाही हे मला ठाऊक आहे, खरंतर मातोश्री हे सर्व हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. यामुळेच हिंदूंनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करणे हा गुन्हा नाही. औरंगाबादमध्ये (Aurangabad)औरंगजेबाच्या कबरीवर चढविली जातात, तेव्हा कुठलीही कारवाई होत नाही त्यावेळी राजकारण आडवे येते, असेही ते म्हणाले. (Ravi Rana:’Their meetings are fixing’, reply to Raj Thackeray)