पुणे ।पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)हे देशाचे पंतप्रधान आहेत . देशाच्या पंतप्रधानाने आवाहन केल्याने आम्हा सर्वांनी गॅसची सबसिडी सोडून टाकली;पण ज्या महिलांसाठी ही सबसिडी सोडण्यात आली, त्या महिलांना खरंच त्या सोडलेल्या सबसिडीचा फायदा झाला का, असा रोखठोक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला शिवाय ‘आकडो से भूक नही लगती जब भूक लगती है तब रोटी लगती है’ या वक्तव्याची आठवणही करून दिली.
पुण्यात राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्यावतीने महागाई विरोधात (against inflation) शनिवार चौकातील शनी मारुती मंदिराच्याबाहेर आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी महाआरतीही करण्यात आली. यावेळी खासदार सुळे म्हणाल्या की,गेल्या काही महिन्यांपासून देशात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. आज देशात एक नव्हे दोन नव्हे तर चार पटीने महागाईमध्ये वाढ झाली आहे. आज मला कै. सुषमाजी यांची आठवण होत आहे. तेव्हाही त्यांचे भाषण भावलं होतं आणि आजही ते भाषण भावत आहे. त्यांनी आमच्या सरकारला विचारलं होत की ‘आकडो से पेट नही भरता,रोटी लगती है’ मला देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हाच प्रश्न आता विचारायचा आहे की, आकडो से भूक नही लगती जब भूक लगती है तब रोटी लगती है, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.माझी देवचरणी एवढीच मागणी आहे की, केंद्र सरकारला सुबुद्ध दे आणि त्यांनी जे झोपायचं सोंग घेतलं आहे. नको त्या विषयाला महत्व देत आहे. हे दुर्दैवी आहे. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की, त्यांनी देशाच्या हितासाठी सगळं काही बाजूला ठेवून त्यांनी देशाची अर्थव्यवस्था कशी टिकवता येईल यासाठी प्रयत्न करावे. सर्व राज्याच्या मुख्यमंत्री यांची बैठक घेऊन यावर तोडगा काढावा,असे देखील यावेळी सुळे म्हणाल्या.