… ‘पेगासीस’ संबंध नाही ; मग कोणत्या देशाने भारतात येऊन हेरगिरी केली!

मुंबई
सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, निवडणूक आयुक्त, वकील ,पत्रकार, विरोधी पक्षनेते यांचे फोन टॅप केले जातात आणि दुसरीकडे केंद्र सरकारचे संरक्षण मंत्रालय म्हणते ‘आम्ही कोणताही  व्यवहार केला नाही’  असे सांगत असेल तर
 जगातील कुठल्या देशाने भारतातील हेरगिरी केली . असा रोखठोक  सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
 modi bjp-‘Pegasus’ is not a relationship; Then which country came to India and spied? -NCP -NAWAB MALIK
केंद्रातील  मोदी सरकारने  पेगासीस  स्पायवेअरचा वापर करून लोकांचे मोबाईल फोन  हॅक  केल्याचा आरोप करीत विरोधी पक्षांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सलग पंधरा दिवसापासून स्थगित केले आहे.  या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे संरक्षण मंत्रालयाने राज्यसभेत लेखी उत्तर दिले आहे.  आमचा काहीही संबंध नसल्याचे संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी राज्यसभेत सोमवारी म्हटले आहे.  त्यावर राष्ट्रवादीचे मलिक यांनी आक्षेप घेत जगातील कुठल्या देशांनी भारतात येऊन हेरगिरी केली असा सवाल केला आहे. 
चौकशी समिती नेमावी
 पेगासीस  स्पायवेअरची निर्मिती करणारी इस्राईल  एनएसओ ग्रुप कंपनी सोबत कोणताही व्यवहार झालेला  नाही असे संरक्षण मंत्रालय सांगत असेल तर जगातील कुठल्या देशांनी भारतात येऊन हेरगिरी केली याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने तात्काळ द्यावे आणि चौकशी समिती नेमावी अशी मागणीही  मलिक यांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *