सोलापूर । सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे( Raj Thackeray )आणि खासदार नवनीत राणांवर (MP Navneet Rana )सडकून टीका केली आहे. हनुमान चालीसा हे मस्जिद किंवा मातोश्री समोर म्हणायचे नसते. तर, मारुतीच्या मंदिरात म्हणायचे असते. पण, नवनिर्माण आणि नवनीत एकच आहेत. हे आम्हाला आत्ता कळले, असे टीकास्त्र मुंडेंनी सोडले आहे.त्यामुळे आता मनसेच्या (mns) गोटातून कोणते प्रत्युत्तर मिळते आणि भाजपची भूमिका काय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
एका कार्यक्रमात धनंजय मुंडे म्हणाले की, डबघाईत आलेल्या गोरगरिबांचा विकास कसा साधता येईल यावर विचार सोडून भोंग्यावर राजकारण सुरू केले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी अशा भडकावू राजकारण्यांपासून सावध राहावे. बेरोजगारीचा प्रश्न सुटेना म्हणून जाती पातीचे राजकारण सुरू करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे, असेही मुंडे यांनी म्हटले आहे.
सकाळी कामाची सुरुवात भगवान हनुमान समोर हनुमान चालीसा पठण करून केली जाते. हनुमान चालीसा घरी किंवा मंदिरात म्हणायची असते. मशिदींसमोर किंवा मातोश्री समोर म्हणायची नाही. मस्जिद हनुमान चालीसा म्हणणारे नवनिर्माणवाले आणि मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणणारे नवनीत एकच आहेत हे आम्हाला कळलेच नाही, असा निशाणा मनसे आणि राणांवर मुडेंनी (Social Justice Minister Dhananjay Munde has slammed Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray and MP Navneet Rana.)साधला आहे.