पुणे। मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा घेऊन मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी पक्षाची धोरणे बदललेली आहेत.प्रखर हिंदुत्वाचा गजर करीत, किंबहुना त्या जोरावर मनसेचे अस्तित्व टिकविण्यासाठी राजकीय वाटचालीची दिशाच बदलली आहे. विकासाची ब्लु प्रिंट ते हिंदुत्व असा हा प्रवास सुरु झाला आहे. त्याचा फायदा होतो कि,पक्षाची दशा हे येणारा काळच सांगणार आहे. मात्र शिवसेनेला (SHIVSENA) खिंडीत पकडताना राष्ट्रवादीची (NCP) कोंडी करणाऱ्या राज ठाकरे यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, जे तीन प्रश्न विचारले आहेत. (Will Raj Thackeray answer Sharad Pawar’s ‘those’ three questions) त्याचे उत्तर महाराष्ट्रदिनी दि १ मे रोजी औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) देणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राज ठाकरे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला पवारांनी प्रत्युत्तर देताना राज्यासाठीची दूरदृष्टी असलेल्या महात्मा फुलेंचे नाव का घ्यायचे नाही?,राज्यातल्या गोरगरीबांसाठी झटणाऱ्या शाहू महाराजांचे नाव का घ्यायचे नाही?,देशाचे संविधान लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का घ्यायचे नाही? हे तीन प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यावर काय बोलतात,याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी घालून दिलेल्या १६ अटी शर्तींनुसार ही सभा घ्यावी लागणार असली तरी त्या अटींचा भंग होतो का हेही यानिमित्ताने महत्वाचे ठरणार आहे. मात्र या सभेच्या आधीच शरद पवार यांनी तीन प्रश्न उपस्थित केल्याने,त्याला राज ठाकरे (Raj Thackeray)हे काय उत्तर देतात हे जितके महत्वाचे आहे,त्याहीपेक्षा मशिदींवरील भोंगे यावरील भाष्याची पुनरावृत्ती ते टाळतात का हा भाग महत्वाचा ठरणार आहे. शिवसेनेनेही मनसेसह (MNS) भाजपला (BJP) टक्कर देण्यासाठी राज्यात विशेषतः मराठवाड्यात लक्ष केंद्रित केले असून राज्यात सभाही घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे १४ मे रोजी मुंबईतील बीकेसी येथे शिवसेना (SHIVSENA) पहिली भव्य सभा घेणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रात सभा घेण्यात येणार आहेत. दुसरी सभा मराठवाड्यात होणार आहे. त्यामुळे आता विरोधकांच्या हल्ल्याला प्रतिहल्ला करण्याची तयारी शिवसेनेने केली असून तसे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत. त्यामुळे हिंदुत्वावर राजकीय आखाडा पेटणार असला तरी उद्या औरंगाबाद सभेत राज ठाकरे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पवारांचे प्रत्युत्तर
सध्या राज्यात जात धर्माचा वापर करून लोकांना आणखी मागे घेऊन जायचा प्रयत्न सुरु आहे. जे मूळ प्रश्न आहेत, ते बाजूला सारून धार्मिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे सगळे सुरु असताना आपले मूलभूत प्रश्न सुटणार आहे का. केवळ सर्वांना मूलभूत प्रश्नांकडून बाजूला सारण्याचा प्रयत्न सुरू आहे असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.