मुंबई । मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकांना पत्र लिहून किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सीआयएसएफचे जवान भाजप नेत्यावर हल्ला झाला, तेव्हा काय करत होते, याची चौकशी करण्याची विनंती केली आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police)एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने पुष्टी केली की, पांडे यांनी सीआयएसएफ डीजींना पत्र लिहून माहिती जाणून घेतली आहे.परिणामी हल्ला झाल्याचा बनाव आहे की नाही याचा उलगडा लवकरच होणार आहे.
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आणि आमदार रवी राणा (MP Navneet Rana and MLA Ravi Rana) यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या वांद्रे निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याचा इशारा देऊन अशांतता निर्माण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे पोलीस स्टेशनला पोहचले. वास्तविक ज्यांना पोलीस ताब्यात घेते,त्यांना भेटण्यासाठी केवळ त्यांचा वकील जाऊ शकतो. मग असे असताना सोमय्या हे पोलीस स्टेशनला का गेले? जाणून बुजून त्यांनी ही कृती केली का? त्यांच्यासमवेत सीआयएसएफच्या जवानांचा पुरेसा ताफा होता का ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
त्यातही युद्ध नौका आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्याचे प्रकरण तापलेले असताना किरीट सोमय्या हे अचानक अज्ञातवासात गेले होते. (Kirit Somaiya had gone into hiding with a security shield) त्यावेळीही सीआयएसएफचे जवान असताना सोमय्या अज्ञातवासात कसे गेले आणि ते कुठे आहेत याची माहिती केंद्र सरकारकडे मागण्यात आली होती.
हे प्रकरण ताजे असताना, सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी शिवसेना नेते आणि माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह चार आरोपींना यापूर्वीच अटक केली आहे, ज्यांनी शनिवारी खार पोलिस स्टेशनच्या बाहेर त्यांच्या गाडीवर दगडफेक केली होती.
सोमय्या यांनी ट्विटरवर दावा केला होता की, मला धक्का बसला आहे, खार पोलिस स्टेशनच्या आवारात ५० पोलिसांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या (SHIVSENA) १०० गुंडांनी माझ्यावर दगडफेक केली. त्यांना मला मारायचे होते.
पोलीस आयुक्त काय करत आहेत? किती माफिया आणि गुंडांना पोलीस ठाण्यात जमण्याची परवानगी होती? दुसऱ्या एका पोस्टमध्ये हनुवटीवर रक्त साकळलेले असल्याचा फोटो होता. उद्धव ठाकरेंच्या गुंडांनी मला मारण्याचा प्रयत्न करण्याची ही तिसरी वेळ आहे.आधी पुणे आणि वाशीम आणि आता पोलीस ठाण्यात (खार मुंबई), असा आरोप त्यांनी केला. मात्र वैदयकिय तपासणीत कोणतीही गंभीर दुखापत नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. केवळ ०.१सेमी व्रण असल्याचे अहवलात म्हटले आहे.
त्यात आता मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकांना पत्र लिहून किरीट सोमय्या यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सीआयएसएफचे जवान भाजप नेत्यावर हल्ला झाला, तेव्हा काय करत होते, याची चौकशी करण्याची विनंती केल्याने हल्ला झाल्याचा सोमय्या यांनी बनाव केला आहे का ? हा प्रश्न तूर्तास महत्वाचा ठरला आहे.