कर्नाटक – गोवा: ‘तो’ वाद पेटवण्यासाठी काँग्रेसने केला हा ‘बदल’

पणजी
गोवा राज्यात सध्या म्हादई नदीच्या पाण्याचा प्रश्न ज्वलंत आहे .हा वाद कर्नाटक आणि विशेषतः गोवा राज्यातील पाणी वाटप मुद्द्यावरून आहे. त्याचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले होते. मात्र राज्यात, केंद्रात आणि कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत पाणीवाटपाचा मुद्दा काँग्रेसकडून तापवला जाणार आहे. त्यासाठी काँग्रेसने नवी रणनीती आखली आहे.
त्यानुसार   कर्नाटकच्या पी.  गुंडू राव यांना गोवा  राज्याच्या निवडणूक प्रभारी पदावरून हटविण्यात आले असून  केंद्रीय अर्थ  मंत्री  पी .चिदंबरम यांची राज्याच्या वरिष्ठ निवडणूक प्रभारीपदी  नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी के. वेणुगोपाल यांनी तसे नियुक्तीचे पत्र चिदंबरम यांना दिले आहे.
म्हादई नदीच्या ज्वलंत प्रश्नांवरून  गुंडू राव यांना हटविण्यामागे   राव हे कर्नाटक राज्यातील आहेत. आगामी विधानसभा  निवडणुकीत पाणी वाटपाचा वाद काँग्रेसला पेटवायचा आहे . रणनीती म्हणून हा बदल करण्यात आला असला तरी मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक 17 आमदार निवडून आले होते.  मात्र त्यावेळी नेतृत्वाकडून वेळीच कोणतीही हालचाल झाली नाही. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी 21 च्या बहुमताचा आकडा काँग्रेसला गाठता  आला नव्हता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *