मंदिरे,प्रार्थनास्थळे मंदिरे इतक्यात खुली करू नयेत
मुंबई
राज्याला कोरोनाच्या संभाव्य तिसरा लाटेचा धोका आहे का ? तसा धोका असल्यास काय दक्षता घेण्यात यावी या प्रमुख मुद्द्यांसह हॉटेल्स, मॉल, रेस्टॉरंटला वाढीव वेळ देता येऊ शकतो का? त्यासाठी कोणते कडक नियम लागू केले पाहिजेत. मंदिरे व प्रार्थना स्थळ खुले केली जाऊ शकतात का या मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स सोबत चर्चा करून सदस्यांची मते जाणून घेतली.
कोरोनाचा प्रादुर्भाव आता आटोक्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध अजुन शिथिल करता येऊ शकतील का ? यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सच्या सदस्यांसोबत चर्चा केली. मुख्यत्वे कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी त्याचा धोका कायम आहे. मात्र व्यापारी वर्ग, नागरिकांकडून निर्बंध शिथिलतेबाबत मागणी जोरदार मागणी होत आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करताना कोणत्या उपाययोजना कराव्यात यावर या बैठकीत सदस्यांची मते जाणून घेण्यात आली.

या बैठकीत मंदिरे, प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत नागरिकांकडून जोरदार मागणी होत आहे. त्यामुळे काय करावे यावर यावेळी चर्चा झाली. मात्र मंदिरे, प्रार्थनास्थळे इतक्यात खुली करू नयेत असं मत टास्क फोर्सच्या सदस्यांनी मांडल्याचे समजते.