नाशिक। शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) जोरदार टोला लगावला आहे. भाजपने (BJP) उत्तर प्रदेशात जे काम ओवैसीकडून (Owaisi) करून घेतले, तेच काम महाराष्ट्रात मनसेकडून करून घेत आहेत. हे काल -परवा हिंदुत्व हाती घेतलेले ओवैसी महाराष्ट्रात (Maharashtra) चालणार नाहीत, अशा शब्दात राऊत यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला.
दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आलेले राऊत यांनी राज ठाकरेंवर कडाडून टीका केली.
ते म्हणाले, भाजपकडून महाराष्ट्रात मनसेचा (MNS) वापर केला जात आहे. वापर करु द्या; पण शिवसेनेला त्याचा फटका बसणार नाही. मुंबईसह सर्व ठिकाणी शिवसेना विजयी होईल. काल परवा हिंदुत्व हाती घेतलेले औवेसी महाराष्ट्रात चालणार नाहीत, या शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता मनसेवर हल्ला चढवला.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाच खरी हिंदुत्ववादी आहे. आम्ही नाशिक जिंकणार. तसंच मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली जिंकणार, असे सांगत त्यांनी मनसेची तुलना औवेसीशी केली.