The BJP came to power at the Center with promises on the issue of survival of the people, the issue of education, the issue of unemployment. However, no one is ready to talk about it when it comes to power. During the Corona period, the entire health system collapsed in Kollam, and no one talks about it. Even so, if the BJP or Raj Thackeray is talking about Hindu-Muslim riots in the same way, it simply means that this is an attempt to keep the people here in emotional issues of religion. Sujat Ambedkar, the leader of the deprived Bahujan Aghadi and son of Prakash Ambedkar, has said that important issues should not be taken into consideration.

BJP-MNS:लोकांना धर्माच्या भावनिक मुद्द्यांमध्ये अडकून ठेवण्याचा प्रयत्न !

औरंगाबाद । 

लोकांचा जगण्याचा  प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न यावर   आश्वासने  देऊन   केंद्रात भाजप सत्तेत आले. मात्र , सत्तेत आल्यावर यावर कुणीही बोलायला तयार नाही. कोरोना काळात तर सर्व आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली होती, त्यावर कुणीही बोलत नाही. असे असतानाही जर भाजपा (BJP )   किंवा राज ठाकरे (  Raj Thackeray ) असेच हिंदू-मुस्लीम (Hindu-Muslim) दंगलीवर बोलत असेल, तर त्याचा सरळसरळ असा अर्थ होतो की, येथील लोकांना  धर्माच्या भावनिक प्रश्नांमध्ये अडकून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. जेणेकरून महत्वाच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष जाऊ नयेत, अशी टीका  वंचित  बहुजन  आघाडीचे नेते तथा प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर  (Sujat Ambedkar)  यांनी केली आहे. 

 औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयात  आयोजित एका कार्यक्रमासाठी आले असता ते माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात.  त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात  नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
   
दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय ब्राह्मण 
  आतापर्यंत आपण कितीही दंगली बघितल्या, बाबरी मस्जिदची दंगल असो, भीमा कोरेगावची दंगल असो, आपण हेच बघितले की, असतात. त्यांच्या वक्तव्यानंतर प्रभावित होऊन दंगलींमध्ये  जे उतरतात, प्रत्यक्षात ती  बहुजन मुले असतात, असे सुजात आंबेडकर  म्हणाले. 
आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवावे… 
राज ठाकरेंना माझे एवढेच म्हणणे होते की, तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल तर बहुजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवावे, अशी टिका देखील सुजात आंबेडकर  यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *