Ajit Pawar criticizes Eknath Shinde government: If all the work is done by the secretary, why should the Chief Minister?

Ajit Pawar: पोलिस कुठे तरी कमी पडले

पुणे । एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार ( SHARAD PAWAR) यांच्या घरावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यानंतर आता पोलिसांवर संशय व्यक्त केला जात आहे. त्यात आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनीही पोलीस या घटनेमागे कोण मास्टरमाईंड आहे,याचा शोध घेतील मात्र   पोलीस कुठे तरी कमी पडले अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे. 

  अजित पवार यांनी म्हटले आहे कि, हा हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचे  अपयश आहे. मला आश्चर्य या गोष्टीचे  वाटते की दोन दिवसांपूर्वी न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर आंदोलन यशस्वी झाले  म्हणून गुलाल उधळून, पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. मग सिल्व्हर ओकवर जाण्याचा उद्देश काय होता? हे पोलीस यंत्रणचे  अपयश आहे. पोलिसांना आधी कसे  कळाले  नाही? असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला  आहे.तसेच सिल्व्हर ओकवर मीडिया (media reached Silver Oak) पोहचला त्यांनी हल्ला कसा झाला ते दाखवले. मीडियाचे  ते कामच आहे मात्र जे मीडियाला कळले,  ते पोलिसांना कसं कळलं नाही? असा सवाल  अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.   
पोलीस विभाग  या हल्ल्यामागे कोण सूत्रधार आहे त्याचा शोध घेतील. एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्यात आली होती. त्यामागे कोण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil)  यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. आम्ही आंदोलकांसोबत आणि संघटनांसोबतही अनेकदा बैठका घेतल्या आहेत. एसटी कर्मचारी संघटनांचे  देखील ऐकत नाहीत. त्यांनी तारतम्य सोडलं, जी भाषा वापरण्यात आली ती आपल्या संस्कृतीत बसत नाही. पोलीस यंत्रणा याचा तपास करुन यामागे कोण मास्टरमाईंड आहे याचा शोध घेतील.असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *