After Raj Thackeray's speech at Gudipadva rally, Vasant More was expelled from the post of MNS Pune city president. Chief Minister Uddhav Thackeray has directly offered MNS's Vasant More to join Shiv Sena. So, we have to see what role More will play now. If Vasant More does 'Jai Maharashtra' to MNS, it will be a big shock.

MNS cracks? : : राष्ट्रवादीपाठोपाठ आता मुख्यमंत्र्यांकडून वसंत मोरेंना ऑफर!

मुंबई।

राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर भोंग्यांना विरोध केल्यानंतर सर्वाधिक चर्चा झालेल्या वसंत मोरे यांची मनसे (MNS) पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर  मोरे यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची चढाओढ सुरू झाली आहे.त्यात आता  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (Chief Minister Uddhav Thackeray has directly offered MNS’s Vasant More to join Shiv Sena) थेट मनसेचे वसंत मोरे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे मोरे आता काय भूमिका घेणार, हे पाहावे लागणार आहे.त्यात वसंत मोरेंनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यास तो मोठा धक्का ठरणार आहे.  

दादर शिवाजी पार्क येथील दसरा मेळावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवा;अन्यथा समोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावू, असा इशारा दिला. मुस्लिम समाजबांधवांसह मनसेमध्ये याबाबत नाराजीचे वातावरण पसरले  आहे. पुणे शहराचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या भूमिकेविरोधात मत व्यक्त केले. कोणताही मशिदीसमोर स्पीकर लावणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे तात्काळ मोरे यांची शहराध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली.
प्रत्यक्षात येत्या मे  महिन्यात मोरे हे पद सोडणार होते. मात्र त्यापूर्वीच भोंग्यावरून मांडलेल्या भूमिकेमुळे मोरे यांना  या पदावरून  हटवले असले तरी, मनसेतच राहणार अशी भूमिका मोरे यांनी मांडली आहे. मात्र आगामी महापालिका निवडणुकीच्या  (forthcoming municipal elections) पार्श्वभूमीवर  जवळपास सर्वच राजकीय पक्षांकडून मोरे यांना पक्षात येण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मोरे  यांना ऑफर दिल्यानंतर आता शिवसेनेनेही (now Shiv Sena has also made a direct offer) थेट ऑफर दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटण्यास बोलावले आहे. वरुण सरदेसाई, आदित्य शिरोडकर यांनी फोनवर संपर्क साधला आहे. मोरे यांनी ऑफर आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.त्यामुळे आता वसंत मोरे कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पुण्यात या अगोदर अनेकांनी मनसेला सोडचिठ्ठी दिलेली आहे. त्यामुळे मोरे यांनी मनसेची साथ सोडली तर शहरात मनसेला ते मोठे खिंडार ठरणार आहे. दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येत आहेत. ते कोणती मात्रा वापरतात याकडे मनसेच्या वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तूर्तास मनसेत अनेकांनी आता केवळ तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *