मुंबई।महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या रोजच्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Nana Patole-Sharad Pawar meeting) यांची भेट घेतली. या भेटीनंतर पटोले म्हणाले, की भाजपला (BJP)कसे उत्तर द्यायचे यासंबंधी येत्या एक दोन दिवसांत चर्चा करुन दिशा ठरवली जाईल.
या भेटीदरम्यान अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे. प्रामुख्याने राज्यात सध्या वीजेचा तुटवडा (load shedding has increased in the state) भासत असल्याने या विषयावर गांभीर्याने चर्चा केली असल्याचे ते म्हणाले.
नाना पटोले म्हणाले की, राज्यामध्ये सध्या लोडशेडिंगचे प्रमाण वाढले आहे. केंद्राने कोळसा न दिल्याने प्रकल्प बंद पडले आहेत, हा प्रश्न तातडीने कसा निकाली काढता येईल यासोबत केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने राज्यात काम करत आहेत याबाबत बैठकीत चर्चा झाली असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.राज्यात सध्या महाविकासआघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडी नेत्यांवर कारवाई करत आहेत. याबाबत भाजपला (bjp) कसे उत्तर द्यायचे? याबद्दल येत्या एक दोन दिवसात चर्चा करून पुढची दिशा ठरवू असेही नाना पटोले म्हणाले.