After the speech of MNS president Raj Thackeray, the political atmosphere in the state has heated up. The Mahavikas Aghadi government and the BJP are pointing guns at each other over Raj Thackeray's stance on mosque horns. Housing Minister Jitendra Awhad also lashed out at Raj Thackeray over the issue but MNS leaders have now become aggressive. MNS Thane-Palghar district president Avinash Jadhav has replied to Jitendra Awhad. Bhonga, Masjid, Musalman heard that Jitendra Awhad falls in his body, in such words Jadhav has replied. If you hear Bhonga, Masjid, Musalman, then Jitendra Awhad comes to mind. Speaking about Raj Thackeray, it is said that Jitendra Awhad makes such statements to show his love for his constituency and not to upset the voters in his constituency, said Avinash Jadhav.

MNS’s reply to Jitendra Awhad:भोंगा, मस्जिद, मुसलमान असे ऐकले की अंगात येते!

ठाणे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांच्या भाषणानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबद्दल घेतलेल्या भूमिकेवर महाविकास आघाडी सरकार  आणि भाजप (BJP)  एकमेकांवर टीकेच्या तोफा डागत आहेत. या विषयावरून गृहनिर्माण मंत्री जिंतेंद्र आव्हाड(Housing Minister Jitendra Awhad)    यांनीही राज ठाकरेंवर  तोंडसुख घेतले मात्र  त्यावरून  मनसे नेते आता आक्रमक झाले आहेत.

 मनसे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव ( MNS Thane-Palghar district president Avinash Jadhav) यांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर दिले आहे. भोंगा, मस्जिद, मुसलमान असे ऐकले की जितेंद्र आव्हाड यांच्या अंगात येते, अशा शब्दात जाधव यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
भोंगा, मस्जिद, मुसलमान असे ऐकले तर जितेंद्र आव्हाड यांच्या अंगात येते. राज ठाकरे यांच्याबद्दल बोलले की प्रसिद्धी मिळते, जितेंद्र आव्हाड हे आपल्या मतदारसंघाबद्दल प्रेम दाखवण्यासाठी आणि आपल्या मतदारसंघात मतदार नाराज होऊ नये यासाठी अशी विधाने करतात, अशी टीका अविनाश जाधव यांनी केली आहे.
… खरंतर दंगली राष्ट्रवादीला घडवायच्या आहेत
 राज ठाकरे यांनी घेतलेल्या भुमिकेवरून राज्यात दंगली घडतील असे काही नेत्यांना वाटते. मात्र, ठाण्यात अनेकदा दंगली घडल्या आहेत, मग ठाण्यातील राबोडी असो वा भिवंडी, भिवंडीत घडलेल्या दंगलीत दोन पोलिसांना आपला जीव गमवावा लागला तेव्हा आव्हाड यांना पुळका नाही आला. , असे वक्तव्य अविनाश जाधव यांनी केले आहे. तर राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे काही दिवसांत ठाण्यातील मशिदींवरील भोंगे काढले गेले नाहीत तर मनसेकडून मशिदींबाहेर मोठंमोठे डीजे आणि भोंगे लावून हनुमान चालीसा लावली जाईल, असा इशारा देखील अविनाश जाधव यांनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *