Nitin Raut's criticism of Raj Thackeray: Such statements as elections approach

Nitin Raut’s criticism of Raj Thackeray:निवडणुका जवळ येतात तसे अशा प्रकारचे वक्तव्य

पुणे । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray)  यांनी गुढीपाडव्याला शिवतीर्थावर भाषण करताना  मशिदी बाहेरील भोंगे काढले नाहीतर दुप्पट आवाजाने मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवा  वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात गदारोळ उडाला आहे. त्यावर  ऊर्जा मंत्री नितीन राऊत  यांनीही  (Energy Minister Nitin Raut has also react) प्रतिक्रिया दिली आहे.

 निवडणुका जवळ येतात तसे अशा प्रकारचे वक्तव्य केले जातात. एखादे गिरगीट जसे रंग बदलतात तसे माणसेही रंग बदलत आहेत, अशी टीका नितीन राऊत यांनी राज ठाकरेंवर केली आहे.

 पुण्यात ( PUNE ) पर्यायी इंधन क्षेत्रातील उद्योजक व गुंतवणूकदारांची परिषद (A conference of entrepreneurs and investors in the alternative fuel sector)आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.   ते म्हणाले,  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानावर माझा विश्वास आहे. भारत (INDIA) देश हा विविध जाती, भाषांनी नटलेला देश आहे. हा देश एकसंघ ठेवण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. कुठल्याही समाजाबद्दल बोलणे चुकीचे आहे. जातीयवाद करायची गरज नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *