अमरावती । महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली (Inflation has hit the general public hard) आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे दर प्रचंड वाढले आहेत. परिस्थिती अतिशय बिकट असताना केंद्र सरकार जे काही करणार ते सोन्याहून पिवळं आणि राज्य सरकार एकदम गटार बनली, असे जे काही सांगण्यात येत आहे. तो अत्यंत घातक प्रकार असून भविष्यात देशाचे तुकडे करणारा असल्याची भीती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर(State Minister for Women and Child Welfare and Guardian Minister Yashomati Thakur) यांनी व्यक्त केली.
केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद नसावा. दोघांचेही अधिकार अत्यंत महत्त्वाचे असल्याकडेही यशोमती ठाकूर यांनी लक्ष वेधले.यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अमरावती शहरातील इरविन चौक येथे महागाईविरोधात जिल्हा काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी यशोमती ठाकूर यांनी वाढत्या महागाई विरोधात केंद्र सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या , केंद्र सरकार जे काही करणार तेच योग्य असा जो काही समज पसरविला जात आहे. तो देश हिताचा नाही. महागाईविरोधात काँग्रेस सातत्याने आंदोलन करीत असले, तरी आता सर्वसामान्य जनतेनेच रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
राज ठाकरेंना खऱ्या समस्या माहिती नाहीत का?
राज ठाकरे वास्तवापासून दूर जात आहेत . खऱ्या समस्या त्यांना माहिती नाहीत का? असा प्रश्नही ठाकूर यांनी उपस्थित केला. गुढीपाडव्याच्या पर्वावर राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणातून त्यांच्याबाबत महाराष्ट्राला असणाऱ्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. राज ठाकरे यांनी अचानक यू टर्न घेतला असून, यामागे काही ‘तडजोड’ झाली आहे का, असा सवालही यशोमती ठाकूर (Yashomati Thakur on Raj Thackeray) यांनी उपस्थित केला आहे.