पुणे । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी शिवतीर्थावरून महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यावर टिका केली. यावर राज्याचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील (Minister of State Gulabrao Patil) यांनी राज ठाकरे यांच्यावर बोचरी टिका केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात फरक आहे. जसे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन ऋतू असतात. तसे राज ठाकरे यांचे ऋतू प्रमाणे आहे. राज ठाकरे यांनी जेव्हा मनसे (MNS) सुरू केली त्याआधी मराठी मुद्द्यावर लढले. मग पक्षाची स्थापना केली आणि हम सब भाई आहे असे सांगितले. आता काय हातचं लागत नाही म्हणून परत ते हिंदुत्वाकडे आले. राज ठाकरे हे आहे. कोणत्याही ऋतूत यांना काहीच मिळत नाही. असे गुलाबराव पाटील म्हणाले.

Gulabrao Patil:राज ठाकरे हे ‘सिझनेबल कार्यक्रम’, चंचल माणूस
पाणी पुरवठा राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. 5 कोटींच्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करण करून स्कीम केल्या जात आहे. बाकीच्या ज्या काही योजना आहे, त्या जिल्हा परिषदेकडून केल्या जात आहे. त्याचा आढावा घेण्यात येणार आहे. देशात आणि राज्यात प्रत्येक गावात पाणी मिळावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने जलजीवन मिशन ही योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील 27 हजार गावात सर्वत्र या योजनेअंतर्गत पाणी द्यायचं आहे. त्याची सुरवात आजपासून होत आहे, असे यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले.त्यानंतर राज ठाकरेंवर बोलताना ते म्हणाले, ३५ वर्षांपासून ओळखतो. अगदी हाफ चड्डीपासून मी कट्टर शिवसैनिक आहे. राज ठाकरे चंचल आहेत. त्यांना कोणत्या धाग्याने मी यशस्वी होऊ शकतो,हेच अजून कळलेले नाही. म्हणूनच ही धडपड सुरु आहे. देशभरात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. यावर पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की हनुमान चालीसा लावू असा टोला यावेळी पाटील यांनी लगावला.