मुंबई । भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ( BJP leader and Union Minister Nitin Gadkari) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) भेट घेतली त्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shiv Sena leader MP Sanjay Raut) म्हणाले, अशा भेटी गाठी होत असतात. प्रत्येक भेटी मागे राजकारण असते असे नाही. यावर बोलावे असं काही नाही. मनसे आणि भाजपची युती होणार का? यावरही फारसे बोलावे असे काही नाही. रात गई बात गई अशा शब्दात राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, औरंगाबाद महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यासह सर्व महानगरपालिका शिवसेना ताकदीने लढेल आणि जिंकेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.
कितीही असंतुष्ट आत्मे…
मुंबई महानगरपालिकेचा भगवा झेंडा कितीही असंतुष्ट आत्मे महाराष्ट्राविरूद्ध एकत्र आले, मराठी माणसाविरूद्ध कितीही कटकारस्थान केली तरी कारस्थानांच्या छाताडावर उभे राहून मुंबई महापालिका जिंकू, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही किती षडयंत्र रचा आम्ही उभे राहू असेही राऊत म्हणाले आहेत.