मुंबई।
पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर महागाईचा भडका होईल. या महागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना पोहोचेल याचा इशारा निवडणुकी आधीच काँग्रेसने (The Congress had warned the general public before the elections) सामान्य नागरिकांना दिला होता.अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी इंधन दरवाढीवर भाष्य केले आहे.
ते म्हणाले, अपेक्षेप्रमाणे केंद्र सरकारनेही आज इंधन आणि घरगुती गॅसच्या दरांमध्ये वाढ करून सर्वसामान्य नागरिकांना महागाईचे चटके दिले आहेत.
सर्वसामान्यांचे प्रश्न भारतीय जनता पक्षाला ( BJP)केवळ निवडणुकीच्या वेळीच दिसतात. त्यामुळे निवडणुकांच्या वेळेमध्ये कोणत्याही वस्तूवर दरवाढ होत नाही. मात्र निवडणूका संपल्या की, लगेच केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची तळतळाट केंद्र सरकारला नक्की लागेल,असेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.