गोवा ।
सोमवार (दि. 21 मार्च)रोजी गोवा भाजपने( GOA BJP ) राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. यावेळी भाजपला 3 अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या 2 आमदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. मात्र, मगोचा हा पाठिंबा आता (However, Mago’s support is now a headache for the BJP.) भाजपला डोकेदुखी ठरत आहे. मगोच्या पाठिंब्यावरून भाजपात दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. अनेक आमदारांनी आपली नाराजी व्यक्त करून पक्षाविरोधातच बंड पुकारले आहे.
सोमवारी भाजपने मगोच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन करण्याचा दावा केल्यानंतर, काही आमदारांनी एक स्वतंत्र बैठक घेतली होती. यात प्रवीण आरलेकर, जोशुआ डिसुझा, प्रेमेंद शेठ, निलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, सुभाष फळदेसाई, रवी नाईक, गोविंद गावडे, बाबुश मोंसरात यांचा समावेश होता. बैठकीनंतर या सर्व आमदारांनी आपली नाराजी व्यक्त केली.
एका हॉटेलमध्ये या आमदारांची बैठक पार पडल्यानंतर या सर्व आमदारांनी रात्री उशिरा काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी याविषयी बोलणे टाळले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने भाजपविरोधात निवडणूक लढवली होती. यामुळेच काही ठिकाणी भाजप उमेदवारांना पराभवाचा फटका बसला, तर काही उमेदवार काठावर पास झाले आहेत. काठावर विजयी झालेल्या आमदारांना यामुळेच मगो विरोधात तीव्र नाराजी आहे. त्यामुळे या आमदारांनी मगोला सत्तेत सहभागी करून घेण्यास विरोध दर्शविला आहे.