MIM: We are ready to join hands with anyone to stop BJP

MIM:भाजपला अडवण्यासाठी आम्ही कोणासोबतही आघाडी करायला तयार

औरंगाबाद ।
भाजपला अडवण्यासाठी आम्ही कोणासोबतही आघाडी करायला तयार असून, महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती एमआयएम(MIM) प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
देशात कुठेही निवडणूक झाली आणि त्यात भाजप विजयी झाले तर, त्याला एमआयएम कारणीभूत असल्याचा आरोप केला जातो. उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजप विजयी झाला त्याला देखील एमआयएमला कारणीभूत धरले जात आहे. नेहमी भाजपची बी टीम म्हणून हिणवले  जाते. त्यामुळे, राजेश टोपे यांची भेट झाली, त्यावेळी भाजपला (BJP) थांबवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत येण्यास तयार आहे. तीन चाकी रिक्षाची आम्हाला सोबत घेऊन कार करा, असा प्रस्ताव दिल्याचे जलील यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!