जालना
परभणी येथील जिल्हाधिकारी गोयल यांच्या बदलीसाठी खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रावरून राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या खासदार संजय जाधव यांनी’ किती दिवस सहन करायचं ,किती दिवस शांत बसायचं. माकडीन सुद्धा वेळ आली की पिल्लू पायाखाली घालते, तर वेळच आली तर राष्ट्रवादीचेही तसे करू. असे वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेत ‘कलगीतुरा’ रंगण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांमध्ये परभणीतील जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या बदली होऊन धुसफूस सुरू आहे. जिल्हाधिकारी गोयल यांच्या बदलीसाठी खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. मात्र त्या पत्रावरून राष्ट्रवादीने खासदार संजय जाधव यांच्या विरोधात मोहीम उघडली परिणामी खासदार जाधव हे संतप्त झाले आहेत. त्यातूनच त्यांनी हे वक्तव्य केल्याने आता नवीन वाद पेटला आहे.