मुंबई।
हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालत आहे का असा संशय आता यायला लागला आहे असे म्हणत, सरदार शहावली खान, सलीम पटेल या बाँम्बस्फोटाशी संबंधीत व्यक्तींकडून नवाब मलिक ( Nawab Malik) यांनी जमिन खरेदी केली आहे. अशा व्यक्तींशी संबंध असतानाही आपण मलिक यांचा राजीनामा घेतला नाही, तर हे स्पष्ट आहे की हे सरकार दाऊदच्या ( Dawood) दबावाखाली चालले आहे ,असा आरोप विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे.
हे ठाकरे सरकार सुलतानी पद्धतीने शेतकऱ्यांची वीज कापत आहे. सर्वत्र सावकारी पद्धतीने वीज बील वसूल केले जात आहे. महाराष्ट्र सरकारने हे बंद केले पाहिजे. हे सरकार निव्वळ कोडगे आहे. मात्र, आम्ही हा विषय लावून धरणार आहोत. वीज तोडणी-जोडणी सोडा आणि लवकर सर्व शेतकऱ्यांची वीज जोडणी करा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
यावेळी प्रविण दरेकर यांच्यावर जी कारवाई झाली आहे, ती निव्वळ राजकीय सुडबुद्धीने कारवाई केली आहे मात्र जो खड्डा खोदतो तोच व्यक्ती खड्ड्यात पडतो हे लक्षात ठेवावे असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.