पुणे दि. महाडमधील पूरग्रस्तांना पुण्यातील हेल्प रायडर्सकडून पहिल्या टप्प्यात ६०० कुटुंबासाठी जीवनावश्यक वस्तू, पाण्याच्या ४०० बॉक्सची मदत करण्यात आली.

कोथरूड येथून पूरग्रस्त ६०० कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तूंसह पाण्याचा साठा स्वच्छतासेवक महादेव चव्हाण यांच्या हस्ते आणि हेल्प रायडर्सचे ३५ स्वयंसेवक संस्थापक अध्यक्ष प्रशांत कनोजिया यांच्या नेतृत्वाखाली महाडला रवाना झाले.यावेळी सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाचे उल्हास रानडे, चंद्रशेखर चिंचोरे, जयश्री वानखेडे, सुहास बटुळे गौरव बेडसगांवकर, राहुल जाधव, दुर्गाप्रसाद कनोजिया, जयंती अलुरकर पवन कनोजिया आदींसह नागरिक उपस्थित होते. महाडसह खरवली, सुतारवाडी, पंचशीलनगर, पोलादपूर, किंजलनगर, ब्राम्हणवाडी आदी पूरग्रस्त भागात ही मदत पोहचविण्यात आली. प्रशांत कनोजिया, सुदिन जायप्पा,अजित जाधव, प्रवीण पगारे , अनुपम शहा, श्रीकांत कापसे , बाळासाहेब ढमाले,प्रशांत महानवर , अमोल गुंजाळ,संतोष पोळ. राहुल वाघवले ,आकाश साळुंखे आदींसह सदस्यांनी नियोजन केले. दुसऱ्या टप्प्यात चिपळूण, खेडमधील बाधितांसाठी मदत करण्यासाठी हेल्प रायडर्सचे पथक जाणार असून मदतीसाठी पुणेकरांनी उत्स्फूर्त योगदान दिले आहे असे हेल्प रायडर्सचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत कनोजिया यांनी सांगितले.

पूरग्रस्तांसाठी असेही योगदान !
जीवनावश्यक वस्तूंचा साठा घेऊन निघालेल्या हेल्प रायडर्सच्या वाहनांसाठी, इंधनाचे पैसे नाकारून भुकूम येथील भारत पेट्रोल पंपाचे मालक सचिन डेंग यांनी मदतकार्यात योगदान देऊन समाजाप्रती कर्तव्य बजावले.