‘त्या’ साठी …राहुल गांधी सायकलवरून संसदेपर्यंत!

नवी दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी भाजपला लक्ष्य करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजूट दाखविण्यास प्रारंभ केला आहे. पेगासस हेरगिcongress cycle rahul gandhi petrol री, महागाई आणि कृषी कायदे यासह विविध मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधी पक्षांनी मोट बांधली असून   काँग्रेसचे  माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काढलेल्या  पेट्रोल – डिझेलच्या वाढत्या किंमती विरोधात सायकल मार्चमध्ये कॉन्स्टिट्यूशन क्लब ते संसदेपर्यंत  सहभागही घेतला.  
राहुल गांधींच्या बैठकीत डावे पक्ष, शिवसेना, द्रमुक, राजद, तृणमू काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल व खासदार सुप्रिया सुळे उपस्थित  होत्या मात्र आम आदमी पक्षाचे नेते गैरहजर होते. सर्व शक्तींची एकजूट करणे, ही माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची बाब आहे. जेवढे लोक एकत्रित, तितका आवाज शक्तीशाली होईल. त्यामुळे भाजप-आरएसएसला दाबून टाकणे कठीण होईल, असे राहुल गांधींनी विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *