चा आधार घेत राज्यपालांच्या कार्यपद्धतीला आक्षेप घेतला आहे तर भाजपच्या गोटातून माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी संविधानानुसार सगळे अधिकार हे राज्यपालांचे आहेत,ते प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना दौरे काढू नका असे कोणीही सांगू शकत नाहीत. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला सल्ला देण्यासाठी ते संविधानानुसार आहेत , असे प्रत्युत्तर दिले आहे. मात्र अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा नवा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. यापूर्वीही त्यांच्या अनेक वक्तव्यामुळे देवेन्द्र फडणवीस यांना सावरासराव करावी लागली होती. विशेषतः महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले होते. या पार्श्वभूमीवर आता राज्यपाल हे निष्ठांवंत आहेत,मग कुणाचे ? हा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जाईल असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. पुण्यातील कार्यक्रमात राज्यपालांसारखे निष्ठावंत, कर्तृत्ववान व्यक्ती मी कधीही पाहिलेला नाही. राज्यपालांच्या दौऱ्याला जे विरोध करत आहेत, त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या नाहीत, म्हणून राग आहे. पण असे व्हायला नको, असे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केले. त्यामुळे ते त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते ;पण राजकीय पटलावर या वक्तव्याचे भांडवल केले जाऊ शकते मात्र तूर्तास तसे काही झालेले नाही पण आगामी काळात होऊ शकते. त्यातही राज्यपालांना कुणाच्या पाठराखणीची गरजच काय ? हा प्रश्न नक्कीच उपस्थित होऊ शकतो,असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
राज्यपाल निष्ठावंत, ‘कुणी’ दिला दाखला!
पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्रात दोन समांतर यंत्रणा कार्यरत असल्याचे भासविण्याचा राज्यपालांचा प्रयत्न आहे का ? अशी टीका राज्यपालांच्या दौऱ्यावरून होत असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे निष्ठावंत असल्याचा दाखला दिला आहे. परिणामी या वक्तव्यामुळे भाजप कोंडीत सापडण्याची दाट शक्यता आहे.
राज्यपालांच्या दौऱ्याला महाविकास आघाडी सरकारने कडाडून विरोध केला आहे. विधानपरिषदेवरील १२ आमदारांच्या नियुक्त्यांसह अन्य मुद्द्यां