नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पेगासस हेरगिरी प्रकरणी संसदेत व संसदेबाहेर गोंधळ सुरू आहे. पेगासस हेरगिरी प्रकरणी चौकशी करावी व संसदेत चर्चा करावी, अशी विरोधी पक्षांनी मागणी लावून धरली आ
हे. तर केंद्र सरकारने चर्चा करण्याची विरोधी पक्षांची मागणी मान्य केली नाही. अशातच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील (एनडीए) सहभागी असलेल्या जनता दलाचे नेते नीतीश कुमार यांनीदेखील पेगासस प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.त्यांच्या या भूमिकेचे खासदार संजय राऊत स्वागत केले आहे.

मी नितीश कुमारांबद्दल आनंदी आहे. ते नेहमी एक आदर्श नेते राहिले आहेत. आज ते केंद्र सरकारसोबत आहेत. मात्र, त्यांचा आत्मा आमच्या सोबत आहे, हे मला माहित आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केले आहे. जर ते म्हणत असतील की पेगासस प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी तर विरोधक जे बोलत आहेत ते तेच बोलले. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतातरी ऐकावे आणि पेगासस प्रकरणाची चौकशी करावी, असेही ते म्हणाले.