आधी मोदींशी चर्चा, १५ दिवसात थेट अमित शहांची भेट!

नवी दिल्ली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना पुन्हा उधाण आले आहे.  विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर तब्बल १५ दिवसानंतर केंद्रीय सहकार मंत्री म्हणून सूत्रे हाती घेतलेल्या अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.sharad pawar amit shaha  ncp bjp new delhi narendra modi
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यान शरद पवार यांच्या समवेत खासदार सुनील तटकरे व राष्ट्रीय  साखर सहकारी संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेकर हेही उपस्थित होते.
मागच्या महिन्यातच शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.  पंतप्रधान कार्यालयाने ट्विटच्या  माध्यमातून या भेटीची माहिती दिली होती.  त्यावर राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र मोदी यांची  भेट घेण्यापूर्वी एक दिवस आधी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.  तर पवार यांनीही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली होती. तसेच  पवार आणि राजकीय रणनितीकर प्रशांत किशोर यांच्यातही बैठक झाली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *