Raj Thackeray's existence will be endangered, says Balasaheb Thorat. He should first worry about his own existence, not Raj Thackeray. BJP state president Chandrakant Patil clarified that Raj Thackeray is capable of worrying about his own existence, but also mentioned that there was no proposal of alliance with BJP. Speaking to reporters in Kolhapur, he said that if Raj Thackeray's meeting had not been allowed, his meeting would have taken place. Moreover, permission has now been granted. Therefore, many citizens of the state will listen to Raj Thackeray's meeting. He also clarified that there is no proposal for an alliance with MNS at this time. The crime of treason and treason is being committed at any time. Therefore, the leaders of all parties should sit down and end this, said Chandrakant Patil.

Chandrakant Patil:राज ठाकरेंसाठी सरसावले चंद्रकांत पाटील;पण युती तूर्तास नाही

कोल्हापूर ।राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे अस्तित्व धोक्यात येईल, असे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणत आहेत. त्यांनी आधी स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करावी, राज ठाकरे यांची चिंता नसावी. राज ठाकरे हे स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करायला स्वतः समर्थ आहेत,  असे  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil ) यांनी स्पष्ट केले मात्र भाजपसमवेत युतीचा कोणताही (but the alliance is not right now)प्रस्ताव आलेला नाही असेही नमूद केले. 

कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळाली नसती तरी त्यांची सभा झालीच असती. शिवाय आता परवानगी मिळाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक नागरिक राज ठाकरे यांची सभा ऐकतील. यावेळी त्यांनी मनसेसोबत युतीबाबतचा कोणताही प्रस्ताव (no proposal for an alliance with MNS at this time) अद्याप नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.राजद्रोहाच्या गुन्ह्यावरून बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचा संकल्प हा राजद्रोह कसा होऊ शकतो? राजद्रोह आणि देशद्रोह गुन्हा कशाही वेळी लावला जात आहे. त्यामुळे सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी बसून हे संपवले पाहिजे, असे सुद्धा चंद्रकांत पाटील म्हणाले.
विविध प्रश्नांसाठी भाजपा रस्त्यावर
 दररोज सर्वच पक्षांचे नेते एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांना महागाई तसेच विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे कोणाचे लक्ष नाही नागरिकांना दिलासा कसा मिळेल विचारले असता, चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) म्हणाले, आम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत राज्यात काम करत आहे. आम्ही आमची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत आहे. सध्या राज्यात भारनियमनबाबत सुद्धा आवाज उठवला.  त्यानंतर भारनियमन करण्याचा निर्णय मागे घेतला गेला. अशाच पद्धतीने राज्यातील विविध प्रश्नांसाठी भाजपा (BJP)रस्त्यावर उतरले असेही ते यावेळी म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *