Mumbai: Some people, including BJP's Kirit Somaiya, have given a presentation to the Union Home Ministry regarding making Mumbai a Union Territory. Somaiya is leading this conspiracy with the connivance of some rich people of Mumbai and some people of BJP. By doing something, they want to make Mumbai a Union Territory. Shiv Sena leader MP Sanjay Raut has made a serious allegation that this is a conspiracy of BJP and all of them are traitors to Maharashtra.

Shiv Sena MP Sanjay Raut: मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा भाजपचा कट

मुंबई ।मुंबईला  केंद्रशासित प्रदेश करण्यासंदर्भात भाजपचे (BJP’s Kirit Somaiya) किरीट  सोमय्यांसह काही जणांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला एक प्रेझेंटेशन दिले आहे. या कटात मुंबईतील काही धनिक, भाजपचे (BJP)  काही लोक यांच्या संगनमताने सोमय्या नेतृत्व करत आहेत. काही करुन त्यांना मुंबई केंद्रशासित करायची आहे. हा भाजपचा कट  असून हे सगळे महाराष्ट्रद्रोही असल्याचा गंभीर आरोप  शिवसेना नेते खासदार (Shiv Sena MP Sanjay Raut) संजय  राऊत यांनी केला आहे.  

 राऊत म्हणाले, किरीट सोमय्या हे दोन कारणांसाठी दिल्लीला जात असतात. एक म्हणजे खोटे कागद घेऊन जायचे  व  दुसरा कट आहे तो मुंबई केंद्रशासित करण्याचा. मुंबईतील काही धनिक, बिल्डर यांच्या संगनमताने किरीट सोमय्या हा कट रचत  आहेत. मुंबई कशी केंद्रशासित करता येईल त्याचं प्रेझेंटेशनही तयार आहे. त्यांना मुंबईतल्या मराठी माणसाचा अधिकार काढून घ्यायचा आहे आणि मुंबईवर केंद्राचे राज्य आणायचे  आहे ,असाही आरोप संजय राऊत यांनी केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *